परोपकारी नजर
खुप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका संध्याकाळी एक वृध्द मनुष्य नदीच्या काठी थंडीत कुडकुडत बसला होता. त्याला नदी पार करायची होती तेवढयात त्याला घोडयांच्या टापांचा आवाज आला. उत्कंठतेने त्याने पाहिले तर, वळणारून अनेक घोडेस्वार येतांना दिसले. घोडेस्वार नदी जवळ आले. एकएक कारून सर्वजण नदी पार करू लागले. वृध्द गृहस्थ हे पहात होता. एका घोडेस्वाराचे त्याच्याकडे लक्ष गेले. घोडेस्वार आपल्या दिशेने चालत येत आहे हे पाहून वृध्द त्याला म्हणाला, राजा मला नदी पार करायची आहे, मला तुझ्या घोडयावरून नेतोस का? हो नेतो ना असे म्हणून घोडेस्वाराने त्या वृध्दास उचलून आपल्या घोडयावर चढवले. दोघांनी सुखरुप नदी पार केली. त्या वृध्दाला घोडेस्वाराने नदी पलिकडील झोपडी पर्यंत नेले. घोडयावरून खाली उतरताना घोडेस्वार वृध्दाला म्हणाला, बाबा एवढया कडाक्याच्या थंडीत नदी कडेला तुम्ही किती वेळ बसला होतात, माझ्या आधी बरेच घोडेस्वार येऊन गेले त्यांना सांगून तुम्ही नदी पार का केली नाही?
तो वृध्द हळूच घोडयावरून खाली उतरला आणि डोळे किलकिले करून म्हणाला, बाळ मी जग पाहिले आहे. अरे तुझ्या आधी जे येऊन गेले त्यातल्या कोणीही माझ्याकडे पाहिले नाही की, थंडीत का इथे बसलात म्हणून विचारले नाही. त्या उलट तु माझ्या जवळ आलास, तुझ्या डोळयात मला दयाळूपणा सहानुभूती दिसली. हेच मी जाणले आणि तुला विनंती केली.
या ह्रदयस्पर्शी बोलण्याने घोडेस्वाराला भरून आले. तो वृध्दाला म्हणाला, या तुमच्या मताबद्दल मी आभारी आहे. हे परमेश्वरा,मला माझ्या कामात इतका व्यग्र कधीच करू नकोस की मला दुस-यांबद्दल सहानुभूती वाटू नये,दुस-यांच्या मी सदैव उपयोगी पडो असा मला अशिर्वाद दे. असं बोलून घोडेस्वाराने घोडयाला टाच् मारली.....
(स्वैर रूपांतर)
भाषांतर : सौ. मधुरा कार्लेकर
एकमेका सहाय्य करू....
हा वर्ग आठवा. वर्गात एकंदर पस्तीस विद्यार्थी-विद्यार्थिनी.या वर्गातील विद्यार्थी सर्व कार्यात पुढेच पुढे. ती वर्गसजावट असो वा ग्रामसफाई. वर्गातले कार्यक्रम असोत वा स्नेहसंमेलनातील स्पर्धा. मग त्यात या वर्गातील मुलांचा सहभाग नाही म्हणजे नवलच.
अभ्यासातही या मुलांनी नंबर सोडला नव्हता.
या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत अनेक आपतग्रस्तांना मदत केली होती. पूर, वादळ, वायुग्रस्तांना यथायोग्य सहाय्य केलं होतं. त्यासाठी ते निरनिराळया युक्त्या प्रयुक्त्या लढवित. कधी वर्गातून वर्गणी गोळा करीत तर कधी मुलांचं एखाद नाटक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून निधी एकत्र करीत या कार्यात वर्गाचा वर्गनायक प्रशांत याचा सिंहाचा वाटा असे; त्याला नेहमी प्रोत्साहन आणि सहकार्य मिळायचं ते शाळेच्या मुख्याध्यापकांचं.
असचं एकदा सर्व शिक्षक व मित्रांना प्रशांतनं फराळाचं आमंत्रण दिलं. घर लहानसच असल्यानं सर्वांची बसण्याची व्यवस्था खालीच केली. पण ती इतकी आकर्षक व स्वच्छ की कुणाचीही नजर एकदम खिळावी. सर्वांनी त्यांचं कौतुक केलं गप्पागोष्टी करीत फराळ झाला.प्रशांतला एक भाऊ होता. त्याचं नाव मनोज. वयानं अगदी दहा बारा वर्षाचा. पण गाण्यात मात्र पहिला नंबर ठेवलेला हे कळताच सा-या विद्यार्थ्यांनी त्याला गाणं म्हणण्याचा आग्रह केला. मनोज आनंदाने तयार झाला. चाचपडत, चाचपडत तो बैठकीत आला. विद्यार्थी आणि शिक्षक आश्चर्याने पाहू लागले. मनोजनं गायला सुरवात केली,
'आई, मी चंद्रावर जाणार
तिथे जावूनी आई मी तर खूप मजा करणार,
मी चंद्रावर जाणार.'
गाणं पूर्ण झालं. साऱ्यांनी टाळया वाजविल्या.
प्रशांत व त्याची आई यांच्या डोळयातून नकळत अश्रु आले. सरांनाही वाईट वाटलं एवढा मधूर गाणारा मुलगा जो चंद्रावर जावू ईच्छितो तो साधं आपल्या सभोवतीचं जग बघु शकत नाही. आपल्या जन्मदात्या आईचं दर्शन घेऊ शकत नाही. चंद्र कसा आणि कुठे आहे हे ज्याला ठावं नाही तो चंद्रावर जाण्याची ईच्छा बाळगतो. केवढा विरोधाभास.
क्षणभर सगळयांना वाईट वाटले. शिक्षकांनी चौकशी केली तेंव्हा कळले की जन्मत:च तो अंधळा आहे. घरी करती सवरती ती आईच. त्यामुळे डोळयाच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा पैसा जमत नव्हता. हे सारं कळल्यावर मुख्यध्यापकांना रहावलं नाही. त्यांनी कशाचा तरी मनाशी निश्चय केला. प्रशांत, मनोज आणि त्याची आई यांचा निरोप घेवून ते निघाले.
दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापकांनी वर्ग आठच्या विद्यार्थ्यांची बालसभा घेतली. एखादा उपक्रम राबवून काही रक्कम एकत्र करायची असे सांगितले. वर्ग आठचेच विद्यार्थी ते!
अगदी खुषीने तयार! मुख्यध्यापकांनी शिक्षकांतर्फे 5000 रू निधी एकत्र करण्याचे अश्वासन दिले. विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊचे पैसे, रूपये आणून मुख्यध्यापकांजवळ दिले. एक हस्तलिखित निवेदन त्यांनी काढलं. इतर वर्गातूनही निधी जमला. निवेदनाला योग्य प्रतिसाद मिळून अवघ्या दोन तीन दिवसात पुरेसा निधी गोळा झाला.
स्वत: मुध्यध्यापक मनोज व त्याच्या आईला घेवून शहरातील एका नेत्रतज्ञाकडे गेले. चाचणीनंतर मनोजच्या डोळयांचं ऑपरेशन अगदी व्यवस्थीत पार पडलं.
आठवडयानंतर आज डॉक्टर मनोजच्या डोळयावरील पट्टी काढणार होते. काय आनंद झाला होता त्याला? सहज गंमत म्हणून डॉक्टरांनी त्याला विचारलं, मनोज, तुला आज नविन दृष्टी मिळणार. यानंतर तू सारी सृष्टी बघणार आहेस. पण त्याआधी मला हे सांग सर्वप्रथम तू कुणाला पाहू इच्छितोस? या अनपेक्षित प्रश्नाने मनोज क्षणभर गोंधळला. थोडा विचार करून तो म्हणाला, डॉक्टर साहेब, मी शाळेचे मुख्यध्यापक व दादाचा मित्रपरिवार यांना प्रथम पाहू ईच्छितो. ज्यांनी मला ही दृष्टी मिळवून देण्यास सढळ व निस्वार्थी मदत केली त्या माझ्या मोठया भावांना मी प्रथम पाहू ईच्छितो. त्याला एकदम गहिवरून आलं.
डॉक्टरांनी मुख्यध्यापक व काही विद्यार्थ्यांना आत सोडलं. डॉक्टरांनी हळूहळू डोळयावरची पट्टी सोडली. थोडया वेळात मनोजला दिसायला लागलं. त्याने एकदम सर, दादा, आई, अशी हाक मारली. प्रशांतने तर त्याला चक्क मिठीच मारली. त्यांची आई हा सारा प्रसंग डोळे भरून पहात होती. कोण आनंद झाला होता तिला आज! तिचा मनोज पाहू शकत होता. आठवडाभरातच त्याला दवाखान्यातून सुटी मिळीली. तो पेढे घेऊन शाळेत आला. मुख्याध्यापकांना मनोजने वाकून नमस्कार केला. आपल्या चिमुकल्या हाताने त्यांना पेढा दिला. मुलांनी दिलेल्या अल्पशा मदतीतून एका बालकाला दृष्टी मिळाली. त्याची चंद्रावर जाण्याची महत्वकांक्षा तो आता पुर्ण करू शकणार होता.
बाल मित्रांनो, आहे ना आदर्श वर्ग!
'एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!' हे ब्रीद ज्यांनी अंगिकारलं ते आदर्श झालेच म्हणून समजा!
श्रीकांत तिजारे - भंडाराघामाचा
पैसा
धन्नाशेटचा मुलगा राम अगदीच आळशी. घरांत गडगंज संपत्ती. एकुलता एक लाडाचा. काम कधी करावंच लागलं नाही. आता २१ वर्षाचा झाला. शेठजींना काळजी पडली. याचे कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल. दुसरे दिवशी त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले हे बघ आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल' मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला. शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला. दुसर्या दिवशी आईकडून घेतला तिसर्या दिवशी मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर पडली स्वारी घराबाहेर काम शोधायला निघाली. पण काय काम करणार ? बारा वाजे पर्यंत हिंडला. काम मिळेना. पोटात कावळे कोकलायला लागले. स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. 'साहेब, इकडे आणा'. ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले. दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. 'बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत ?' शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला, 'बाळा आता मला काहीं काळजी नाहीं कारण खर्या कष्टाची किंमत तुला आज कळली. दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम फेकली पण तुला राग आला नव्हता कारण त्या मागे कष्ट नव्हते.' स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई.
सुमती निगुडकर
यशाचा घडा
वसिष्ठांची पत्नी अरूंधती ज्ञानी, विद्वान, पतिव्रता होती.
एकदा सूर्य अग्नी व वरूणासह वसिष्ठांच्या आश्रमात आले. तेंव्हा अरूंधती पाण्याचा घडा घेऊन नदीवर जायला निघाली होती. तिने तिघांना बसायला आसन दिलं आणि म्हणाली, 'थांबा थोडं, आता नदीवरून एवढा घडा भरून आणते.' त्यावर सूर्यदेव म्हणाले, 'आई नदीवर कशाला? मीच मंत्रसामर्थ्याने देतो घडा भरून' एवढे म्हणून त्यांनी मंत्रसामर्थ्याने घडा भरला, पण तो घडा १/२ रिकामाच राहिला. शेवटी तो पूर्ण भरण्याचे काम अरूंधतीने केले. नंतर ती म्हणाली कोणत्याही यशाचा ३/४ वाटा देवदत्त असला तरी १/४ भाग भरण्यासाठी मानवी प्रयत्नच लागतात. निढळाच्या घामाने उरलेला १/४ घडा भरणे भाग आहे.
सुमती निगुडकर
लाख मोलाचा देह
एक भिकारी भीक मागता मागता एका श्रीमंत व्यापार्याच्या वाडयासमोर उभा राहून भीक मागू लागला. मालकाने सेवकाला त्याला वर बोलावयाला सांगितले. सेवक बोलवायला आलेला पाहून भिकार्याला खूप आनंद झाला. त्याच्या मनांत आशा निर्माण झाली की, वर बोलावलं म्हणजे बरच काही देणार असेल.
वर गेल्यावर व्यापारी म्हणाला, 'हे बघ तुला मी पाचशे रूपये देतो पण त्याबद्दल देतो पण त्याबद्दल तु मला तुझे डोळे दे'
'छे ! छे ! हे कसं शक्य आहे ? डोळे दिले तर मी काहींच करू शकणार नाही.' भिकारी म्हणाला.
'बरं मग असं कर हात तरी देतोस कां?' व्यापारी म्हणाला.
अशाप्रकारे व्यापारी प्रत्येक अवयवाची किंमत वाढवत होता पण भिकारी एकही अवयव द्यायला तयार नव्हता.
व्यापारी म्हणाला 'बघ ५००-५०० रूपये म्हटले तरी तुझ्या देहाची किंमत लाखाच्यावर झाली. एवढा लाख मोलाचा धडधाकट देह असतांना भीक कां मागतोस ? कष्ट कर पैसे मिळवं'.

No comments:
Post a Comment