स्तोत्र १
प्रात:स्मरण
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।। १ ।।
शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। २ ।।
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम: ।। ३ ।।
या कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेषजाडयापहा ।। ४ ।।
ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ५ ।।
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। ६ ।।
पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ७ ।।
अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ८ ।।
अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च सप्तैते चिरजीविन: ।। ९ ।।
अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका: ।। १० ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ११ ।।
भोजनापूर्वीची प्रार्थना
वदनि कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे
सहज हवन होते नाम घेता फुकाचे
जीवन करि जिवीत्वा अन्न हे पूर्ण ब्रम्ह
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म ।। १ ।।
जनी भोजनी नाम वाचे वदावे
अति आदरे गद्य घोषे म्हणावे
हरि चिंतने अन्न सेवीत जावे
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे ।। २ ।।
उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासि सदा नमावे
सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वांमुखी मंगल बोलवावे ।। ३ ।।
ॐ सह नाववतु सह नौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै
तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शांति: शांति: शांति: ।।
शुंभकरोति
शुभं करोति कल्याणम्
आरोग्यम् धनसंपदा
शत्रुबुध्दी विनाशाय
दीपज्योतिर्नमोस्तु ते ।
दिव्या दिव्या दीपत्कार
कानी कुंडल मोतीहार
दिव्याला पाहून नमस्कार ।
तिळाचे तेल कापसाची वात,
दिवा जळो सारी रात
दिवा लावला तुळशीपाशी,
उजेड पडला विष्णूपाशी
माझा नमस्कार सर्व देवांपाशी|
पसायदान
आता विश्वात्मके देवे येणे वाग् यज्ञे तोषावे
तोषोनि मज द्यावे पसायदान हे ।। १ ।।
जे खळांचि व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रति वाढो
भूता परस्परे पडो मैत्र जिवांचे ।। २ ।।
दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्मसूर्ये पाहो
जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात ।। ३ ।।
वर्षत सकळमंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी
अनवरत भूमंडळी भेटतु भूता ।। ४ ।।
चला कल्पतरूंचे आरव चेतनाचिंतामणींचे गाव
बोलते जे अर्णव पीयूषाचे ।। ५ ।।
चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन
ते सर्वांही सदा सज्जन सोयरे होतू ।। ६ ।।
किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनि तिन्ही लोकी
भजि जो आदिपुरुषी अखंडित ।। ७ ।।
आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये
दृष्टादृष्टविजये होआवे जी ।। ८ ।।
येथ म्हणे श्रीविश्वेशरावो होईल दानपसावो
येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला ।। ९ ।।
संत श्री ज्ञानेश्वर महाराज
It's good sir
ReplyDeleteपुण्यश्लोको जनार्दनः याबद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे
ReplyDelete